औरंगाबाद- थंडीने राज्यातून काढता पाय घेतला असे वाटत असतानाच थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यातील तापमान एक ते दोन अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस अनेक भागातील तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा खाली घसरला होता. त्यामुळे थंडी जाऊन उन्हाळ्याची चाहूल लागली असे वाटत होते. मात्र पुढचे दोन दिवस मराठवाड्यातील काही भागातील तापमान एक ते दोन अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यानंतर किमान तापमानात हळू हळू वाढ होईल, मात्र 19 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यताच वर्तवली आहे.
पुढील दोन दिवस उत्तर मराठवाड्यात म्हणजे परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यात आहे. त्यानंतर किमान तापमानात हळू हळू 2 ते 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे 10 अंश एवढे नोंद झाले असून मुंबईदेखील 17 अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. राज्यातील किमान तापमानात पुन्हा एकदा किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान थोडे खाली आहे. तर उत्तरेआणि विदर्भातही थंडीचा प्रभाव अधिक आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रत्र कृष्णानंद होसळीकर यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील तापमान-
औरंगाबाद- किमान 13.6, कमाल- 31.4
परभणी- किमान 14.0, कमाल- 32.6
नांदेड- किमान 19.0, कमाल- 32.6
बीड- किमान- 13.0, कमाल 29.0
उस्मानाबाद- किमान- 14.0, कमाल- 32.3
हिंगोली- किमान – 18.0, कमाल- 31.0