BREAKING NEWS: राज्यात मागील अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असून आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलय
आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थ वर राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहे या बैठकीत या संदर्भात काही चर्चा झाली का? येत्या निवडणुकीमध्ये ठाकरे व मनसे एकत्र लढणार का? या चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंनी संजय राऊत व अनिल परब यांच्यासह राज ठाकरेंची भेट घेतली.तर यावेळी मनसेचे संदीप देशपांडे व बाळा नांदगावकर उपस्थित होते. या भेटीत नक्की काय चर्चा झाली? हे अजूनही स्पष्ट झाले नसले तरी, या बैठकीत पालिका निवडणुकीच्या रणनीती बद्दल चर्चा झाली असल्याचं बोलल जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काय रणनीती असावी याचा आराखडा निश्चित केला जाऊ शकतो. त्याच बरोबर दसरामेळाव्याला ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का? या चर्चांना उधाण आले आहे.या बैठकीत जागा वाटपावर देखील चर्चा झाल्याचं देखील बोलल जात आहे.
यावर राजकीय नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. विचारे म्हणाले, “दोघे भाऊ एकत्र आले तेव्हा पासून तयारी सुरू झाली, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याण सरकारला धसका” सुप्रिया सुळे म्हणाल्या,” समविचारी पक्षांसोबत काम करण्यास नेहमीच उत्सुक”
उद्धव ठाकरेंनी गणपतीमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी शिवतीर्थ वर कुटुंबीयांसोबत हजेरी लावली होती. पण आज मात्र काहीही कारण नसताना भेट घेतली आहे. दोघांनीही आपापल्या प्रमुख नेत्यांसोबत भेट घेतली व अडीच तासाची बैठक पार पडली.
Nepal Gen Z Protest : माजी पंतप्रधानांच्या बायकोला जिवंत जाळलं; ‘जेन झी’ आंदोलकांचा हिंसाचार
संजय राऊत आणि अनिल परबही उद्धव ठाकरेंच्या सोबत राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती मिळाली असून ही भेट पूर्वनियोजित (BREAKING NEWS) असल्याचं बोलला जात आहे.
या भेटीमुळे आगामी दसरा मेळाव्यात ठाकरे (BREAKING NEWS) बंधूंच्या युतीचं सीमोल्लंघन होणार असल्याचंही बोललं जात आहे.