विदर्भात पुढील ५ दिवस उष्णतेची लाट, उत्तर आणि मध्य भारत होरपळणार !

597 0

मुंबई – एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा देणारा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी तापमानाच्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील तापमान दिवसेंदिवस भडकत आहे. अनेक जिल्ह्यांचे तापमान हे चाळीशी पार गेले आहे. त्यातच आता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. दुपारी घरी किंवा ऑफिसमध्येच राहा आणि अगदी आवश्यक असेल तरच प्रवास करा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
अनेक ठिकाणी तापमानाच्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

देशातील बहुतांश भागांना उष्णतेचा तडाखा बसला आहे. 2 मे पर्यंत पूर्व, मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहिल. हवामान विभागाने पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित वायव्य भारत आणि मध्य भारतासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिवसा तापमान 2 अंशांनी वाढण्याचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तापमानात 2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान दोन अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

“पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. या काळात ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता”, असं ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!