VIRAR BHONDUBABA NEWS: अंधश्रद्धा विरोधी कायदा करून अनेक वर्ष झालेली असताना
अजूनही आपण अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडलेलो नाही.
अजूनही अंगात येणे, भूतबाधा होणे,
यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवून अनेक जण भोंदू बाबांना (BHONDUBABA) बळी पडतात.
अगदी अशाच पद्धतीने एका अल्पवयीन मुलीच्या अंगात आलंय,
म्हणून मित्राने तिला भोंदू बाबा कडे नेलं,
https://youtu.be/lSF7KNQQ3ew?si=BiVB268JRIofdBSt
बाबा ने थेट तिला लॉजवर नेऊन विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केले.
ही धक्कादायक घटना मुंबईच्या विरार परिसरात घडली.
घटनेच्या दिवशी पीडित मुलगी जीवदानी मंदिरात दर्शनासाठी गेली होती.
मात्र तिथे तिच्या अंगात आल्याचं सांगत तिच्या एका मित्राने तिला भोंदू बाबाकडे नेलं.
या बाबा ने मुलीला पाहून तिच्या अंगात भूत असून हे भूत उतरवण्यासाठी काही विधी करावे लागतील असं सांगितलं.
हा विधी पूर्ण करण्यासाठी भोंदू बाबाने तिला दुचाकीवरून थेट राजोडी बीचवर नेलं.
त्याच परिसरात असलेल्या एका लॉजवर नेऊन मुलीसोबत जबरदस्ती केली.
तिने नकार दिल्यानंतरही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले
आणि एवढेच नाही तर तिला तिथेच सोडून हा बाबा पसार झाला.
या घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी तात्काळ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासात दोषी आढळल्याने या तरुणीला भोंदू बाबा कडे नेणाऱ्या तिच्या मित्रावरही गुन्हा दाखल केला.
त्यानंतर घटनेचा कामगिरी ओळखून पोलिसांनी अवघ्या चार तासात दोन्ही आरोपींना अटकही केली.