उपेक्षित समाज घटकांच्या विकासात विनायक मेटे यांचं मोठं योगदान – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

269 0

मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. 

मेटे यांच्या अकाली निधनानं सर्वांनाच धक्का बसला असून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी देखील विनायक मेटे यांना आपले श्रद्धांजली अर्पित केली असून शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या  विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत  मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं राज्यपाल भगतसिंग कोष्यारी म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!