पुणे- पुण्यातील जांभूळवाडी येथील साई प्रसाद अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये तेरा वाहनांनी पेट घेतल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एका चारचाकी वाहनासह तेरा दुचाकी भस्मसात झाल्या.
जांभूळवाडी येथील दरी पुलाजवळ साई प्रसाद अपार्टमेंट असून या अपार्टमेंट मध्ये दहा फ्लॅट आहेत. या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली. यामध्ये इतर तेरा वाहनांनीही पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली असून सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.