पुणे- मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पुणे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मनसेचे नेते अजय शिंदे, बाबू वागस्कर आणि अनिल शिदोरे, साईनाथ बाबर उपस्थित होते. या बैठकीत साईनाथ बाबर यांना शहराध्यक्षपदाचे पत्र देण्यात आले.
यानंतर वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, “आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे”. कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड. खुप खुप अभिनंदन साई”
खालील लिंकवर क्लिक करून वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट वाचा
https://www.facebook.com/255049118412693/posts/1065493244034939/?sfnsn=wiwspwa