वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, ‘तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच…’

442 0

पुणे- मनसेचे माजी शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी आताच एक फेसबुक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करून म्हटलंय… तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच…

नगरसेवक वसंत मोरे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हजर झाले. पाण्याच्या प्रश्नासंदर्भात 17 मार्च रोजी वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी महानगरपालिकेमध्ये आंदोलन केले होते. पुणे महानगरपालिकेच्या आवारात कोणतेही आंदोलन करण्यास मनाई असताना त्यांनी आंदोलन केल्यामुळे तेथील सुरक्षारक्षकाने लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

वसंत मोरे यांनी म्हटलंय की, आम्ही पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला एकत्र आलो. आम्ही एकत्रच आहोत. आमच्यात काही मतभेद आहेत, मनभेद नाहीत. असे मोरे यांनी म्हटले आहे.

वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा

https://www.facebook.com/vasantmore88/posts/564221435062230

Share This News
error: Content is protected !!