पुणे- मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांची पुढील भूमिका काय असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. आज झालेल्या राजकीय घडामोडीनंतर टॉप न्यूज मराठीने वसंत मोरे यांची exclusive मुलाखत घेतली. यामध्ये ‘वसंत मोरे यांची निष्ठा राज ठाकरे यांच्यासोबतच !’ असल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. आगामी महापालिका निवडणूक मनसे तर्फे लढवणार, दुसऱ्या पक्षातून लढवणार की अपक्ष या प्रश्नावर मात्र त्यांनी ‘निवडणुकीला अजून सहा महिन्याचा कालावधी आहे, तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी जाणार आहे’. असे सूचक वक्तव्य केले आहे. पाहूया वसंत मोरे नेमके काय म्हणाले ?
नगरसेवक वसंत मोरे यांची exclusive मुलाखत ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/topnewsmarathimh/videos/510747663792879