वसंत मोरे मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

277 0

पुणे- मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर पुणे महापालिकेतील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राजसाहेबांच्या भाषणामुळे आपण संभ्रमात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले होते. आता पक्षबांधणीसाठी बनवलेल्या पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून वसंत मोरे लेफ्ट झाले आहेत.

राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून पुण्यातील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. आता पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे.

उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख या ग्रुपमधून वसंत मोरे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र खरे कारण काय असावे याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत.

Share This News
error: Content is protected !!