VASAI FORT VIRAL VIDEO:  शिवरायांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यावर शिवरायांच्या वेशात फोटोशूट करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला परप्रांतीय सुरक्षारक्षकाकडून अडवण्यात आलं. किल्ल्यांवर अनेक जोडपी येतात, अनेकांकडून अश्लील कृत्य केली जातात, अनेकदा किल्ल्यांवर दारू पार्ट्या रंगतात.

VASAI FORT VIRAL VIDEO: शिवरायांच्या वेशातील फोटोशूटवरून RD KING आणि सुरक्षारक्षकाचे वाद

6210 0

VASAI FORT VIRAL VIDEO:  शिवरायांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यावर शिवरायांच्या वेशात फोटोशूट करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला परप्रांतीय सुरक्षारक्षकाकडून अडवण्यात आलं.

किल्ल्यांवर अनेक जोडपी येतात, अनेकांकडून अश्लील कृत्य केली जातात, अनेकदा किल्ल्यांवर दारू पार्ट्या रंगतात.

मात्र त्या सगळ्यावर वचक ठेवण्याऐवजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये फोटोशूट करणाऱ्या तरुणाला दमदाटी करण्यात आली.

रुपेश हुलावळे असं या तरुणाचं नाव असून तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. नेमकं त्याच्याबरोबर काय घडलं पाहूया..‌

आरडी किंग नावाने प्रसिद्ध असलेला रुपेश हुलावळे सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतो.

दिवाळीचा पार्श्वभूमीवर त्याला छत्रपती शिवरायांच्या वेशात वसई किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात फोटोशूट करायचं होतं.

त्यासाठी तो किल्ल्यावर पोहोचला. मात्र त्यावेळी त्याला परप्रांतीय सुरक्षारक्षकाकडून अडवण्यात आलं.