क्षणार्धात सायकलस्वारावर कोसळला बॉम्ब, युक्रेनमधील हल्ल्याचा थरारक व्हिडिओ पाहा

2215 0

नवी दिल्ली – युक्रेनला चारही बाजूंनी घेरून रशियावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्याचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

रशिया-युक्रेनमधील भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन मीडियाने मोठा दावा केला आहे. अमेरिकेच्या 3 उच्च अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेचा हवाला देत अमेरिकन मीडियाने म्हटले आहे की, रशिया काही दिवसांत युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेईल आणि नंतर प्रतिकार निष्फळ करेल असा अमेरिकन सरकारचा विश्वास आहे.

रशिया आता युक्रेनवर कसा कहर करत आहे, याचे हृदयद्रावक दृश्य समोर आले आहे. युक्रेनची सामान्य जनता या युद्धाची कशी शिकार होत आहे. एका भितीदायक व्हिडिओवरून त्याचे चित्र स्पष्ट होत आहे. युक्रेनच्या रस्त्यावरून एक सायकलस्वार जात आहे. त्याच्या मनात युद्धाची काळजी नक्कीच आहे, पण पुढच्याच क्षणी त्याचे काय होणार आहे याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहे. निर्जन रस्ता आहे, मग अचानक हवाई हल्ला होतो. मोठा आवाज झाल्याने आगीचे दृश्य सर्वत्र पसरते. आणि क्षणार्धात सर्व काही नष्ट झाले. व्हिडिओ पहा.

 

https://twitter.com/realistqx1/status/1496757503195029508

 

 

Share This News
error: Content is protected !!