Breaking News ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत ? मंत्रालयातील सचिवांना ऑनलाईन संबोधित करणार

375 0

मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या गटामध्ये शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार सहभागी झाल्यामुळे राज्यातील सरकार अल्पमतामध्ये आलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री मंत्रालयातील सर्व सचिवांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त सचिव उपस्थित राहणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!