टीईटी घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे याची जामीनावर सुटका

317 0

पुणे- राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सुपे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष होते.

डिसेंबर महिन्यात पुणे सायबर पोलिसांनी त्याला केली होती. टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं होतं. आरोपी सुकाराम सुपे, सुखदेव ढेरेसह १५ जणांविरोधात ३,९९५ पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणातील प्रितेश देशमुखलाही याआधी जामीन मंजूर झाला होता.

२०१९-२० साली झालेल्या टीईटी परीक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!