पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील उंबर्या गणपती चौक ते गरूड गणपती चौकदरम्यान वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात आलं आहे.
उद्या सकाळी नऊ ते दुपारी तीन यादरम्यान या रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील उंबर्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक दरम्यान वाहतूक सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. तसेच, सेवासदन चौक ते उंबर्या चौक दरम्यान वाहतुकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.
पर्यायी मार्ग कसे असतील आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया.
लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकाकडून टिळक रस्त्याकडे जाणारी वाहने सेवासदन चौकातून बाजीराव रस्त्याने जातील
निंबाळकर तालीमकडून लक्ष्मी रस्त्याने जाणारी वाहने कुंटे चौकातून सरळ कुमठेकर रस्त्यावरून इच्छित स्थळी जातील
नागनाथ पारकडून उंबर्या गणपती चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून जाणारी वाहने सरळ पत्र्या मारूती चौक, रमणबाग चौकातून इच्छित स्थळी जातील
पत्र्या मारुती चौकातून लक्ष्मी रस्त्याने जाणारी वाहने सरळ कुमठेकर रस्त्यावरून इच्छितस्थळी जातील
खालकर तालिम चौकातून विजय टॉकिज चौक, लक्ष्मी रस्त्याने न जाता कुमठेकर रस्त्याने इच्छितस्थळी जाता येईल