राज्यात सध्या निवडणूक प्रचार जोरात सुरू असतानाच एक नवा राजकीय वाद समोर आला आहे. कोथरूडमधील (KOTHRUD) निलेश घायवाळ प्रकरणातील आरोपींना परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप भाजप नेते मुरलीधर (MURLIDHAR MOHOL) मोहोळ यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपांना मोहोळ यांनी ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
मुरलीधर मोहोळ(MURLIDHAR MOHOL) यांनी स्पष्ट आव्हान देत म्हटलं की, माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत. जर हे आरोप सिद्ध झाले, तर मी राजकारणातून संन्यास घेईन. मात्र आरोप सिद्ध झाले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांनीच राजकारणातून संन्यास घ्यावा, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर खुल्या चर्चेसाठी मी एका व्यासपीठावर येण्यास तयार असल्याचंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.