टास्क फोर्सच्या बैठकीत मास्क बाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

763 0

राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला.

या बैठकीत मास्क बाबत देखील निर्णय घेण्यात आला असून तूर्तास राज्यात मास्क सक्ती करण्यात आलेली नाही.
मात्र गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून मास्क वापरावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

त्याचबरोबर पुढील पंधरा दिवसांत रुग्ण संख्येचा आढावा घेऊन निर्बंधाबाबत निर्णय घेतला जाईल असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

Share This News
error: Content is protected !!