महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा पालखी मार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी , पहा फोटो

448 0

महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune Crime : लहुजी साळवे स्मारकाच्या भूमिपूजनानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची

Posted by - March 2, 2024 0
पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या (Pune Crime) माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्य शासनाकडून…
Pune News

Pune News : नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा जंगी सत्कार; ‘पुनीतदादा बालन मित्र मंडळाने केले आयोजन

Posted by - June 5, 2024 0
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune News) नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा ‘गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक…

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
नाशिक- गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला…
Thane News

Thane News : प्रवाशांच्या मदतीसाठी RPF जवान ट्रेनमध्ये चढला, मात्र उतरताना घात झाला अन्…

Posted by - August 14, 2023 0
ठाणे : कसारा रेल्वे स्थानकात एक धक्कादायक (Thane News) घटना घडली आहे. यामध्ये एका RPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

#MAHARASHTRA : अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ; 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

Posted by - February 8, 2023 0
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *