पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

425 0

पुणे-सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा चौकात दोन कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तिघांना लोणी काळभोरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गुरुवारी (ता. २८) आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. श्रीनीक प्रभाकर होले (वय २७, रा. यवत, ता. दौंड) आणि एक पादचारी (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला, तर संकेत बाळासाहेब भंडलकर (वय-२१,) सुनिल निळाराम शितकल (वय-२२, रा. दोघेही केसनंद, ता. हवेली), अनिल बाळासाहेब जाधव (वय-२२, रा. पोंडे, ता. पुरंदर) असे जखमी असलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी हर्बल संजय चांदणे (वय २६, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, (ता. हवेली) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!