खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह 9 खासदारांना संसदरत्न जाहीर

233 0

नवी दिल्ली -संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी संसदरत्न पुरस्कार 2022 साठी निवडलेल्या 11 खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि बीजेडीचे अमर पटनायक यांचा समावेश आहे, असे प्राइम पॉइंट फाऊंडेशनने मंगळवारी सांगितले.

11 खासदारांमध्ये लोकसभेतील आठ आणि राज्यसभेतील तीन सदस्यांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण तथा उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसद विशिष्ट रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सोबतच तृणमूल काँग्रेसच्या खासदार सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेट), भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हीना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) या खासदारांना 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल त्यांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!