राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी बाबत सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

347 0

मुंबई – स्मृती इराणी यांच्या काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात म्हणाल्या की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारलेलं तुम्ही पाहिलं? ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का? हा शाहू, फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमी महिलांचा मान-सन्मान केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगते की, आजच्यानंतर जर महाराष्टात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेवर अंगावत हात उगारण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वत:त तिथे जाईन आणि त्याच्याविरोधात कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन” असा इशारा त्यांनी दिला.

काय घटना घडली होती ?

बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन सुरु होते. यावेळी स्मृती इराणी यांना वाढत्या महागाई आणि घरगुती गॅसच्या किमतीबाबत राष्ट्रवादीच्या महिला निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी भाजपच्या या तीन कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच साडीचा पदर ओढून अश्लील हातवारे केले. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!