सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन…..’

464 0

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या पराभवानंतर डायलॉग टाकला आहे. ‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन तो अमिताभ बच्चन है’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी पराभव मान्य करून भाजपचे अभनंदन केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. भारतीय जनता पार्टीला शुभेच्छा. शरद पवार म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती, परंतू त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते अखंड राहिली. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा जे अपक्ष आमच्यासोबत होते ते जागेवरच आहेत. महाविकास आघाडीची मते इनटॅक्ट राहिली आहेत. मात्र जे अपक्ष आमच्यासोबत नव्हते, ते आमच्यासोबत आले नाहीत. राष्ट्रवादीशी संबंधित आमदार संजय शिंदे यांचे मत मिळाले नाही, याबाबत आम्ही बसून चर्चा करणार आहोत”

“कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है” असा डायलॉग त्यांनी टाकला. सुळे म्हणाल्या, “आमचे नेते ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करते आहे. जास्त बोललात तर ईडीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. एकदा अपयश येतं तेव्हा लोकांना असे वाटते की यांची स्ट्रॅटेजी चुकली”

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!