ऐन दिवाळीत होणार प्रवाशांचे हाल; उद्यापासून एसटी कर्मचारी संपावर
ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने 6 नोव्हेंबरपासून संपाची हाक दिली आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. bhad bhabie 2025 त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सुर्फ संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. या संपात 68 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
