एसटी विलिनीकरणासंदर्भातला अहवाल सरकारकडून कोर्टात सादर, सुनावणी 22 फेब्रुवारीला

397 0

मुंबई- एसटी विलिनीकरणासंदर्भातला उच्चस्तरीय समितीचा अहवाल कालच राज्य सरकारनं उच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता या अहवालासंदर्भात 22 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यासह संपूर्ण एसटी कर्मचाऱ्यांचे या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या शंभर दिवसांपासून संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एक उच्चस्तरीय समिती बनवण्यात आली आहे. त्यात राज्याच्या मुख्य सचिवांसह, अप्पर मुख्य सचिव आणि परिवहन विभागाच्या प्रधान सचिवाचा समावेश आहे. या समितीनं सर्व एसटी कामगार संघटना तसेच महामंडळाचे कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेतलं. त्यांनी मांडलेले मुद्दे, अभिप्राय नमूद असलेला अहवाल समितीनं मुख्यमंत्र्यांना सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर आपला अभिप्राय दिला.

मात्र कालच संध्याकाळी बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांच्या अभिप्रायासह हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. शुक्रवारच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारतर्फे अहवाल सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागितला गेला होता. कोर्टाने 18 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला होता. मात्र काल उशिरा अहवाल प्राप्त झाल्यानं राज्य सरकारतर्फे तो हायकोर्ट रजिस्ट्रारकडे सीलबंद लिफाफ्यात सादर करण्यात आला आहे. हायकोर्टात पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Share This News

Related Post

IPS अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारला राज्य कारागृह प्रमुख पदाचा पदभार

Posted by - December 18, 2022 0
पुणे : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त यांनी आज सकाळी राज्य कारागृहप्रमुख पदाचा पदभार अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्याकडून स्वीकारला…

नववर्ष, जयस्तंभास मानवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

Posted by - December 8, 2022 0
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१…

चॉकलेट खाण्यासाठी तो भारतीय हद्द ओलांडायचा, पण एके दिवशी…

Posted by - April 15, 2022 0
आगरतळा – चॉकलेट खरेदी करण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना सांगितले की,…

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर राज्याच्या गृह खात्यावर नाराज, कारण….

Posted by - March 31, 2023 0
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्याच्या गृह खात्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा…

केसरी टूर्सला ग्राहक न्यायालयाचा दणका ; सहलीसाठी भरलेले 55 हजार शुल्क व्याज व नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश

Posted by - September 28, 2022 0
पुणे : आजीचे निधन झाल्याने सहलीसाठी पैसे भरलेले असताना सहल रद्द करून पुढच्या सहलीसाठी ते पैसे उपयोगात आणायची विनंती ग्राहकाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *