एसटी कर्मचारी आक्रमक ! शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन

583 0

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईतील शरद पवार यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले आहे. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. एसटीच्या विलीनीकरणात शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

एसटीचे विलीनीकरण होणार नाही असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. या कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेशही दिले. त्याचप्रमाणे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करायची नाही असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले. परंतु या निर्णयावर एसटी कर्मचारी समाधानी नसून एसटीचे विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.

एसटीच्या विलीनीकरणात शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात येत आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांनी काही आंदोलनकांना ताब्यातही घेतले आहे.

हे आंदोलन भाजपने पेटवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न भाजप आणि गुणरत्न सदावर्ते करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!