Breaking News ! १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, उद्या इयत्ता १० वीचा निकाल जाहीर होणार

396 0

मुंबई- परीक्षेचा निकाल कधी लागणार यांची उत्सुकता १० वीच्या विद्यार्थ्यांना लागली आहे. आता त्यांच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे उद्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल उद्या 17 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होईल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.

Share This News
error: Content is protected !!