Special Story : न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी कोण? पाहा परभणीतील घटनेची संपूर्ण स्टोरी

5969 0

परभणी : मागील आठवड्यात परभणी शहरातील स्टेशन परिसरात असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पुढील संविधानिक शिल्पाची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उफाळला. समस्त आंबेडकरी संघटना, आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंसाचाराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

परभणी शहरात स्टेशन परिसरात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील असलेल्या संविधान शिल्पाची एका व्यक्तीने विटंबना केली. त्यानंतर या घटनेमुळे परभणी शहरात आंबेडकरी संघटना ,आंबेडकरी समाज चांगलाच आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला. आंदोलनामुळे शहरात अनेक ठिकाणी जाळपोळीचे आणि रास्ता रोकोचे प्रकारही घडले. या घटनेनंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन केलं. अनेकांना ताब्यातही घेतलं. याच आंदोलनातील एक तरुण असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकालाही पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. परंतु त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्क्यांना झाल्याचं सांगण्यात येत असतानाच आता शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू जोरदार मार लागल्याने झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून पुढे आली आहे.

न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेला आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी नेमका कोण आहेत?
न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेला आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी हा परभणीत एका महाविद्यालयामध्ये कायद्याचं शिक्षण घेत होता. सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बी च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. सोमनाथ सूर्यवंशी च्या आधार कार्ड वरील माहितीनुसार त्याचं संपूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असून त्याचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला. आता शवविच्छेदन अहवालातून आलेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मल्टिपल इंजुरीज मुळे झाल्याचं स्पष्ट झाले. आता ह्या मृत्यूनंतर सामान्य जनतेतून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

आता या मृत्यूनंतर आंबेडकरी समाजाकडून संताप व्यक्त केला जात असून, विरोधकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याची भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचा असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!