राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

578 0

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुण्यात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात भस्मराज तिकोणे (रा. कसबा पेठ, पुणे), प्रमोद कोंढरे ( रा. नातूबाग, पुणे) आणि मयूर गांधी (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन सुरु होते. यावेळी स्मृती इराणी यांना वाढत्या महागाई आणि घरगुती गॅसच्या किमतीबाबत राष्ट्रवादीच्या महिला निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी भाजपच्या या तीन कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच साडीचा पदर ओढून अश्लील हातवारे केले. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!