Crime

सिंधुदुर्गमध्ये आंबे चोरल्याचा संशयावरून तरुणांना नग्न करून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

512 0

वेंगुर्ले- सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबे चोरल्याच्या संशयातून तरुणांना नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. वेंगुर्ले-उभादांडा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल केला जात आहे.

या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाण करून व्हिडिओ देखील बनवला आहे आणि तो व्हायरल सुद्धा केला आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करून शिवीगाळ करण्याचा प्रकार देखील स्पष्ट झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेतील एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हा व्हिडिओ १ मिनिटांचा आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आंब्याच्या चोरीवरून संभाषण सुरु आहे. त्यामध्ये मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही ऐकू येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!