SHUBHANSHU SHUKLA EARTH RETURN भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (SHUBHANSHU SHUKLA) यांच्यासह चारही अंतराळवीर (EARTH RETURN) पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात 18 दिवस राहिल्यानंतर आज दिनांक 15 जुलैला हे अंतराळवीर परतले आहेत.
VIDEO NEWS: अंतराळ अभ्यासक लीना बोकील यांची EXCLUSIVE मुलाखत
‘ऑक्सिओम-4’ या अंतराळ मोहिमेतील सदस्य 18 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक राहिले आहेत.
त्यानंतर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी त्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
चारही अंतराळवीरांचा अंतराळ यान कॅलिफोर्नियातील एका समुद्रात लँड झालं.
शुभांशू शुक्ला २५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर वरून फाल्कन 9 रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात गेले होते.
आज 15 जुलैला ते परतले आहेत. त्यानंतर आता या चारही अंतराळवीरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
10 दिवस त्यांना देखरेखी खाली ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण भारतभरात शुभांशूच्या येण्याने आनंदाचे वातावरण असून जल्लोष साजरा केला जात आहे.
यापूर्वी सुनीता विल्यम्स यांच्या येण्याने अशाच प्रकारे जल्लोष साजरा करण्यात आला होता. तशाच पद्धतीने शुभांशु शुक्ला परतल्यानंतरही आनंद साजरा केला जातो आहे.
ड्रॅगन कॅप्सूल मधून शुभांशु बाहेर येतानाची दृश्य आता पाहूयात…(vedio)
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची ऑक्सिओम -4 या मोहिमेसाठी निवड झाली होती 41 वर्षांपूर्वी 1984 मध्ये सोवियत युनियनच्या अंतराळयानातून भारताचे राकेश शर्मा यांनी अंतराळात प्रवास केला होता. त्यानंतर शुभांशू यांचा हा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेत उपयुक्त ठरणार आहे.
शुभांशू शुक्ला यांच्या पृथ्वीवर परतण्यामुळे देशभर आनंद उत्सव साजरा केला जात आहे. आता भारतीयांना प्रतीक्षा आहे ती शुभांशू शुक्ला भारतात परत येण्याची..