देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी ते भाजपाचे विधानपरिषदेचे उमेदवार; कोण आहेत श्रीकांत भारतीय ?

635 0

मुंबई- राज्यात विधानपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपले उमेदवार घोषित केले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पत्ता यंदाही कट करण्यात आला. उमेदवारी जाहीर झालेले श्रीकांत भारतीय नेमके कोण, याचीही उत्सुकता अनेकांना लागली आहे.

विधान परिषदेच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. ते भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे ते प्रमुख होते. अनाथ मुलांसाठी देखील श्रीकांत भारतीय यांचं मोठं असून ते अनाथ मुलांसाठी तर्पण फाऊंडेशन नावाची संस्था देखील चालवतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणून देखील श्रीकांत भारतीय यांची ओळख आहे.

श्रीकांत भारतीय हे देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या कारवर अज्ञातांकडून हल्ला झाला होता. २०१९ ला अमरावतीत ही घटना घडली होती. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीशी या हल्ल्याचा संबंध जोडला गेला होता. मात्र सुदैवाने त्या हल्ल्यावेळी श्रीकांत भारतीय कुटुंबासह बाहेर गेले असल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्यावेळी या घटनेमुळे त्यांची सुरक्षितता वाढवण्यात आली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!