पुणे : पुण्यातील लोणी काळभोर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यास करताना सातत्याने मोबाईल पाहतो म्हणून आई रागावली याचा राग आल्याने मुलाने आईला थेट भिंतीवर ढकलून दिले. आणि त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आई आणि मुलाचा अभ्यास करताना मोबाईल पाहण्यावरून वाद झाला या वादाचे मोठे परिणाम आईला भोगावे लागले आहेत.
जिशान हा बारावीमध्ये शिकत असून आईने मोबाईल पाहतो म्हणून त्याला रागावलं होतं. याचाच राग मनात धरून जीशानने आईला भिंतीवर ढकल आणि त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. जिशानने त्यानंतर संशय येऊ नये म्हणून आईच्या हाताची नस देखील कापली. मात्र रक्त न आल्याने त्याने मृतदेहाला पंख्याला लटकवलं आणि तिने आत्महत्या केली असा बनाव देखील रचण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शवविच्छेदन अहवालामध्ये गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्या असल्याचे उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी पती जमीर शेख आणि मुलगा यांची वेगवेगळी चौकशी केली असता मुलाने खून केला असल्याची कबुली दिली.