आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूज

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ

मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली असून संजय राऊत यांना ईडीकडून तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता संजय राऊतांच्या ईडीकडून 8 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक रविवारी (ता.31 जुलै) सकाळी 7 वाजता दाखल झालं होतं.

तब्बल 9 तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि त्यानंतर रात्री उशीर राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली.