पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कुणाची ? धनुष्यबाण कोणाचा ? शिवसेना भवन कोणाचं ? असा वाद सुरू असतानाच आता निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव यावर तोडगा काढला आहे. तर शिवसेना भवन कोणाचे यावर शिंदे गटानं आपल्या नवीन शिवसेना भवना विषयी माहिती दिली आहे.
पुण्यामध्ये सारसबागेच्या समोर ‘बाळासाहेबांची शिवसेना भवन’ या शिंदे गटाच्या कार्यालयाचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दिवाळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन केलं जाणार असल्याची माहिती शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिली.
तत्पूर्वी एकनाथ शिंदे हे दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार होते, अशी देखील चर्चा होत होती. तथापि आता पुण्यामध्ये सारसबागेच्या समोर पाच हजार चौरस फुटावर बाळासाहेब शिवसेना भवनाची निर्मिती केली जाते आह. या कार्यालयामध्ये मीटिंग हॉल, पत्रकार परिषद हॉल आणि जनता दरबार हॉलचं नियोजन करण्यात येत आहे.