ठळक बातम्याब्रेकिंग न्यूज

प्रवाशांची दिवाळी होणार गोड; हंगामी भाडेवाढ न करण्याचा महामंडळाचा निर्णय

विजयादशमी अर्थात दसरा झाल्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे दिवाळीमध्ये दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ केली जाते.  

यावर्षीही 25 ऑक्टोबर 2024 ते 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र आताही भाडे वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या दिवसाला सुमारे 23 ते 24 कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न महामंडळाला मिळते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र 6 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती.