फरार संदीप देशपांडेंचा मुंबई पोलिसांकडून कसून शोध, पोलिसांची खास पथके रवाना

604 0

मुंबई- मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अद्याप शोध लागलेला नाही. या दोघांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची पथके रवाना झाली असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर मुंबईत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिसांनी देखील मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली होती. त्याचवेळी संदीप देशपांडे यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांना हुलकावणी देऊन संदीप देशपांडे आणि संतोष धुरी कारमधून पसार झाले. यावेळी झालेल्या झटापटीत महिला पोलीस जखमी झाली होती.

काय घडले त्या दिवशी ?

मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली. देशपांडे यांना पकडताना झालेल्या झटापटीमध्ये महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडून जखमी झाली. तेव्हापासून मुंबई पोलिसांकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अजूनपर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नाही.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide