संजय राऊत यांचे मौनव्रत, काय म्हणतात आपल्या ट्विटमध्ये ?

192 0

मुंबई – दररोज मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडणारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मौनव्रत धारण केले आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेना नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर होत असलेल्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि माजी स्थायी सभापती यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदीवरूनही शिवसेना खासदार संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारले होते . त्यावर संजय राऊत यांनी जैन डायरीचा उल्लेख करत उत्तरही दिलं.

खासदार राऊत म्हणाले होते की , जाधव यांची डायरी जर विश्वासार्ह असेल तर यापूर्वी आलेल्या जैन डायरी व बिर्ला डायरी सुद्धा विश्वासार्ह मानून त्यात नमूद असलेल्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. जैन डायरीच्या वेळी भाजपच्या नेत्यांची नावे उघड झाल्याबरोबर डायरीतील नोंदी विश्वासार्ह नसल्याचे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन केले होते . एका डायरीला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय, ही दुटप्पी भूमिका मान्य नाही.

मात्र आता संजय राऊत यांनी मौन बाळगल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं…’ यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला आहे.

Share This News

Related Post

शैक्षणिक कर्ज म्हणजे काय ? शैक्षणिक कर्जातून मनासारखे शिका; जाणून घ्या सविस्तर माहिती

Posted by - March 4, 2023 0
आजकाल शिक्षण खूप महाग झाले आहे. प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणाचे शुल्क सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. शाळेपर्यंतच्या शुल्काची तरतूद सामान्य नागरिक कशीबशी…

मार्गशीर्ष गुरुवार विशेष महालक्ष्मी व्रत-पूजेचे महत्व

Posted by - December 1, 2022 0
मार्गशीर्ष गुरुवार विशेष : मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून…
Ashok Pingle

Ashok Pingle : नवी मुंबईतील अशोक पिंगळे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Posted by - January 25, 2024 0
नवी मुंबई : नवी मुंबईतील अशोक पिंगळे (Ashok Pingle) यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. एकट्याने दुचाकीवर…

#Pre-Wedding Shoot साठी हि ठिकाण आहेत स्वर्ग ! प्लॅन करतं असाल तर पहाचं

Posted by - March 10, 2023 0
सध्या प्री वेडिंग शूट ट्रेंडमध्ये आहेत. यासाठी प्री-वेडिंग शूटसाठी कपल्स वेगवेगळ्या ठिकाणी जातात. यावेळी ड्रेसिंग सेन्सकडेही पूर्ण लक्ष दिलं जातं.…
raj-thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; हायकोर्टाकडून ‘तो’ गुन्हा रद्द

Posted by - November 10, 2023 0
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्यावरील गुन्हे आणि त्या अनुषंगानं न्यायालयानं सुरू केलेली कारवाई रद्द करण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *