मुंबई- अखेर राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सहावा उमेदवार म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य्सभेच्य सहव्य जागेच सस्पेन्स संपलेला आहे.
संभाजीराजे यांना उमेदवारीसाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून शिवसेनेकडून निवडणूक लढण्याबाबत होकार आला नाही. अखेर आज शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
कोण आहेत संजय पवार ?
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या ९ वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते.
उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट आणि एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. लढाऊ कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक अशी संजय पवारांची कायमची ओळख. भाजप, काँग्रेसने अनेकदा त्यांना आमिष दाखवत पक्षात घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिक ही ओळख कायम ठेवण्यातच संजय पवारांनी आनंद मानला. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल ३० वर्षे संजय पवार सहभागी आहेत.
संभाजीराजेंना शह देईन एवढा मोठा मी नाही
संभाजीराजेंना शह देईन एवढा मोठा मी नाही. ते आमचे राजे आहेत. संभाजीराजे किंवा मोठे राजे काय त्यांचे छोटे चिरंजीव देखील समोर आले तरी मी त्यांच्या पाया पडतो. हे शिवसैनिकावरील संस्कार आहेत. राजेंचा माझ्याकडून असा कुठला अपमान व्हावा अशी माझी अपेक्षा नाही, परंतु उद्धव ठाकरेंनी लढ म्हटले तर मला लढावेच लागेल