ब्रेकिंग न्यूज ! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर, संजय पवार यांना उमेदवारी

271 0

मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. 

संभाजीराजे यांना उमेदवारीसाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून शिवसेनेकडून निवडणूक लढण्याबाबत होकार आला नाही. अखेर आज शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींसोबतच चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून शिवसेनेकडून निवडणूक लढण्याबाबत होकार आला नाही. काल संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागी शिवसेनेचाच उमेदवार असणार असे वक्तव्य केले होते.

त्यानंतर सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची वर्णी लागली आहे. अद्याप पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं असल्याने आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात, तसेच संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढवणार का? हे पहावं लागेल.

Share This News
error: Content is protected !!