Breaking News एकाच कुटुंबातील ९ जणांची विष प्राशन करुन आत्महत्या, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना

488 0

सांगली- मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. मात्र आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोपट यल्लापा वनमोरे (52),संगीता पोपट वनमोरे (48),अर्चना पोपट वनमोरे (30),शुभम पोपट वनमोरे (28),माणिक यल्लापा वनमोरे (49),रेखा माणिक वनमोरे (45),अनीता माणिक वनमोरे (28),आदित्य माणिक वनमोरे (15),अक्काताई वनमोरे(72)

माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन सख्ख्या भावांच्या संपूर्ण कुटुंबातील हे सर्व मृतदेह आहेत. रविवारी रात्री नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. एका खोलीत तीन मृतदेह तर दुसऱ्या खोलीत 6 मृतदेह सापडले.

आतापर्यंतच्या तपासात कोणाच्याही अंगावर जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही भावांच्या कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

 

Share This News
error: Content is protected !!