सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार, सीबीआयकडून वाझेचा अर्ज मंजूर

491 0

मुंबई- सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी केलेला अर्ज मान्य केला आहे. सचिन वाझेंनी आरोपींविरोधात आपल्याकडे असणारी सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली असून यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समावेश आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेंनी केलेला अर्ज मान्य केला आहे. सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सर्व तरतुदी तसंच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

कोर्टाने सचिन वाझेंची याचिका स्वीकारल्यास त्यांची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाईल. तसंच पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. यानंतर सचिन वाझेंना खटल्याला सामोरं जावे लागणार नाही. सचिन वाझेंनी ईडीकडेही अशीच विनंती केली होती. ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!