रुपाली पाटलांचा नारायण राणेंना दम, म्हणाल्या, ‘बेडकासारखे आलात कुठून ? कडेकडेने निघा’

369 0

मुंबई- नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याने शरद पवार साहेबांना पोकळ धमक्या देऊ नयेत, तुम्ही आम्हाला घर गाठणं कठीण करताय, की आम्ही तुमचं घराबाहेर पडणं बंद करतो, हे बघा, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी दिला. तुम्ही बेडकासारखे आलात कुठून, त्या बेडकाने कडेकडेने निघायचं, अशा शब्दात पाटलांनी राणेंचा समाचार घेतला.

‘शिवसेनेच्या बंडखोर गटातील आमदारांना मुंबईत येऊ द्या. अनेक आमदार एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा काढू घेतील आणि सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करू असे वक्तव्य शरद पवार यांनी यांनी पत्रकार परिषदेत केले होते. त्यावरून नारायण राणे यांनी ट्विट करून शरद पवार यांना धमकी दिली. नारायण राणे म्हणाले की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल.

नारायण राणे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी नारायण राणे यांना दम दिला आहे. नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याने शरद पवार साहेबांना पोकळ धमक्या देऊ नयेत, तुम्ही आम्हाला घर गाठणं कठीण करताय, की आम्ही तुमचं घराबाहेर पडणं बंद करतो, हे बघा, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी दिला. तुम्ही बेडकासारखे आलात कुठून, त्या बेडकाने कडेकडेने निघायचं, अशा शब्दात पाटलांनी राणेंचा समाचार घेतला.

‘नारायण राणे यांनी शरद पवारांना धमकी दिली, त्याला कोणी गांभीर्याने घेत नाही. बंडखोरांची मदत करायला आलेले नारायण राणे हे तुम्ही रचलेलं तर कुभांड आहे. तुमच्यावर ईडीची कारवाई होऊ नये, म्हणून तुम्ही स्वतः भाजपमध्ये गेलात आणि आता धुतल्या तांदळासारखे असल्याप्रमाणे बोलताय. ज्या सत्तापिपासू लोकांना ही सत्ता मिळवायची आहे, मी पुन्हा येईनचे झटके त्यांना येतात. त्यांनी महाराष्ट्रात हे रचून आणलंय’ असा आरोप रुपाली पाटील यांनी केला.

परिस्थिती गंभीर असली तरी सरकार आणि शरद पवार खंबीर आहेत. त्यामुळे राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्यांनी पोकळ धमक्या देऊ नये. आणि ही त्यांची भूमिका आहे की पक्षाची आहे, ते एकदा सांगावं. मग आमचंही रक्त हिंदुत्वाचं, छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचं आहे. आम्ही तुमचं घराबाहेर येणं बंद करतोय, हे पाहा. तुमच्यासारखे गुंड भरपूर आहेत, पण शरद पवार एकच आहेत, जगातील वरिष्ठ नेते आणि तुम्हा सगळ्यांचा बाप आहेत, असा इशाराच रुपाली पाटील यांनी दिला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!