नवी दिल्ली- आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेतली. गडकरींसोबतचे फोटो शेअर करत ट्विटरद्वारे ही माहिती रोहितने दिली आहे. गडकरींसोबत भेट झाल्यावर रोहित पाटील म्हणाले की, दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणे गरजेचं आहे. ह्या वाक्याची आज प्रचिती आली.
"दिल्ली मध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे" ह्या वाक्याची प्रचिती आज आली.
"आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज" हे वाक्य धीराचे होते.
आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. pic.twitter.com/mKJqVmRwIf— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) April 5, 2022
रोहित पाटील आपल्या जिल्ह्यातील काही काम घेऊन गडकरींकडे गेले होते. तेव्हा “रोहित तू बिनधास्त जा, तू सांगितलेलं काम झालं म्हणून समज” असे धीराचे वाक्य गडकरीचें होते, असे रोहित पाटील ट्विट करत म्हणाला.