किसान सभेच्या राज्य अधिवेशनात शाळा बंदीच्या निर्णया विरोधात ठराव

192 0

पुणे : आज दिनांक २.१०.२०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेत राज्य सरकारने वीस पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्याबाबतची चर्चा झाली. शिक्षण हक्क कायद्यातील कलम चारनुसार वस्तीपासून एक किलोमीटर अंतरावर पाचवीपर्यंत आणि तीन किलोमीटरवर आठवीपर्यंतचे शिक्षण मिळाले पाहिजे. कमी पटसंख्येचे कारण देऊन शाळा बंद केल्यास मुलांना खूप अंतर पायी पायी चालत जायला लागेल.

वाटेत घनदाट जंगल, ओढे, नदीनाले, महामार्ग, रेल्वे रूळ, खाडी असतात. डोंगराळ भागात मुसळधार पाऊस कोसळत असतो. शाळा दूर अंतरावर गेली की मुलींचे शिक्षण थांबेल. ६ ते १४ वयोगटातल्या मुलांना तीन किलो मीटर पेक्षा जास्त अंतर चालायला लावू नये असे सर्वोच्च न्यायालयाने ८.९.२०१७ रोजी दिलेल्या निकालात म्हटले आहे.

वंचित बहुजन, आदिवासी आणि दलित मुलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जाईल. शाळाबाह्य मुलांची संख्या वाढेल. बालमजुरी आणि मुलींचे बालविवाह वाढतील अशी भीती वाटते. शाळा बंद करणे म्हणजे संविधानाची पायमल्ली केल्यासारखे होईल. घटनेशी विसंगत असलेला शाळा बंद करायचा निर्णय मागे घ्यावा. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Aadhar

Aadhar Update : आधार फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ

Posted by - September 8, 2023 0
भारतीय नागरिकांना केंद्र सरकारकडून (Aadhar Update) आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आधार कार्डवरील तपशीलात विनामूल्य बदल करण्याची मुदत तीन महिन्यांनी…
Washim News

Washim News : समृद्धी महामार्गावर कार उलटून भीषण अपघात; 4 जण जखमी

Posted by - September 20, 2023 0
वाशिम : समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील (Washim News) शेलुबाजार जवळ जंगली…

मनसेचं ‘मिशन विदर्भ’; राज ठाकरे विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात

Posted by - September 18, 2022 0
नागपुर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून ( ता.18 सप्टेंबर) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला…
Narhari Zhirval

नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत केला डान्स (Video)

Posted by - May 21, 2023 0
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) हे स्पष्टवक्तेपणा आणि साध्या राहणीमानामुळे ओळखले जातात.…

शिवसेनेला मोठा धक्का! राष्ट्रवादीवर आरोप करत ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

Posted by - June 26, 2022 0
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *