‘पुष्पा’ सिनेमाची प्रेरणा घेऊन अडीच कोटींचे रक्तचंदन स्मगल करणारा गजाआड (व्हिडिओ)

234 0

मिरज- दक्षिणेतील पुष्‍पा चित्रपटामुळे सध्या देशभर रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेरणा घेऊन एका चोरट्याने तब्बल अडीच कोटींच्या रक्तचंदनाचे स्मगलिंग करण्याचा प्रयत्न केला. पण मिरज पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा पुष्पा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

यासीन इनायतउल्ला खान (वय ४५, रा. अद्रिकरणहळी, बेंगलोर, कर्नाटक) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तचंदनाची अवैध वाहतूक करणारे एक वाहन सांगली शहरात येणार असल्याची माहिती मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास धामणी रोडवर थांबलेल्या टेम्पोची (13 KA-:6900) तपासणी केली. पोलीस आणि वन विभागाने केलेल्या कारवाईत रक्तचंदनाचे ३२ ओंडके आढळले. हे रक्तचंदन फळांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरेटमागे लपवले होते. जप्त केलेल्या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. पोलिसांनी वाहन चालक यासीन खान याला अटक केली. कर्नाटकातून आणलेले रक्तचंदन पुढे कोणाला पोहोचवले जाणार होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सध्या देशभर गाजत असलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय गाजत असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले.

रक्तचंदनाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो मिरजेतील गांधी चौक पोलिसांनी पकडला असून, त्यातील सुमारे अडीच कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. वाहन चालक यासीन इनायतउल्ला खान (वय ४५, रा. अद्रिकरणहळी, बेंगलोर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. कर्नाटकातून आणलेले रक्तचंदन पुढे कोणाला पोहोचवले जाणार होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. सध्या देशभर गाजत असलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय गाजत असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune Crime : लहुजी साळवे स्मारकाच्या भूमिपूजनानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची

Posted by - March 2, 2024 0
पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या (Pune Crime) माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्य शासनाकडून…

पुण्यातील धक्कादायक घटना ! सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा बेदम मारहाण करून खून

Posted by - June 29, 2022 0
पुणे- सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा बारच्या…

HEALTH WEALTH : शरीरात व्हिटॅमिन-A च्या कमतरतेमुळे दिसून येतात ‘ही’ लक्षणे, हे पदार्थ आहारात वाढवा

Posted by - February 23, 2023 0
HEALTH WEALTH : व्हिटॅमिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन-ए, जे…

गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा

Posted by - August 19, 2023 0
गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *