RBI कडून रेपो दरात 35 बेसिस पॉइंट्सची वाढ

316 0

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पतधोरण धोरण जाहीर केलं. यावेळी रेपो दरात 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. त्यामुळं आता रेपो दर 6.25 टक्क्यांवर गेला आहे.

याआधी वाढती महागाई रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने सलग तीन वेळा रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ केली होती. सध्या आरबीआयच्या पतधोरण समितीने आर्थिक वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तटस्थ भूमिका घेत रेपो दरात वाढ केली आहे.यंदाच्या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.८ टक्के राहील, असे दास यांनी म्हटल आहे.

आरबीआयचचा रेट निश्चित करणाऱ्या पतधोरण समितीने जूनपासून मागील तीन बैठकांमध्ये कर्ज दर प्रत्येकी ५० बेसिस पॉइंट्सने वाढवला होता. मे मध्ये रेपो दरात ४० बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. यामुळे याआधी रेपो दर ५.९ टक्क्यांच्या तीन वर्षांच्या उच्चांकावर गेला होता. आता तो ६.२५ टक्क्यांवर पोहचला आहे. सप्टेंबरच्या वाढीपूर्वी आरबीआयने जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दर प्रत्येकी ५० बेसिस पॉइंट्सने आणि मेमध्ये ४० बेसिस पॉइंट्सने वाढवले ​​होता.दरम्यान, किरकोळ महागाई दर हा आरबीआयने पतविषयक धोरण ठरवताना विचारात घेतलेल्या प्रमुख घटकांपैकी एक असतो. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर ६.७७ टक्क्यांवर होता, जो आरबीआयच्या अंदाजापेक्षा अधिक होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!