12 दिवसांनंतर रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा यांना अश्रूंचा बांध फुटला, व्हिडीओ होतोय व्हायरल

645 0

मुंबई- बारा दिवसांच्या तुरुंगवासानंतर राणा दांपत्याची सुटका झाली. नवनीत राणा यांची सुटका झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर ते थेट पोहोचले लीलावती रुग्णालयात. आणि या ठिकाणी पाहायला मिळाले भावनिक दृश्य.

रवी राणा यांनी रुग्णालयात असलेल्या नवनीत राणा यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा यांच्या डोळ्यातून अश्रू आले. राणा दाम्पत्यांची ही भावनिक भेट कॅमेरात कैद झाली असून सोशल मीडियावर या संबंधिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं तर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. बुधवारी न्यायालयाने या दोघांनाही जामीन मंजूर केल्यानंतर आज दोघांचीही सुटका झाली. दरम्यान, नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळेच रवी राणा यांनी तुरुंगातून बाहेर पडताच लीलावती रुग्णालय गाठलं.

या ठिकाणी दोघांची भेट होताच नवनीत राणांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडले. हा भावनिक प्रसंग कॅमेरॅत कैद झाला. थोड्याच वेळात हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!