ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे पुण्यात निधन

419 0

पुणे- आपल्या वैविध्यपूर्ण चित्रनिर्मितीमधून चित्र रसिकांना आनंद देणारे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे (वय ८७) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसांपासून ते पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.

भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून रवी परांजपे यांची ओळख आहे. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. परांजपे जगभरात बोध चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. जाहिरात आणि प्रकाशन या क्षेत्रात महत्त्वाची ठरणारी बोधचित्रकला, लावण्य योजना कला (डिझाईन), वास्तुबोधचित्रकला आणि स्वान्त सुखाय सृजनात्मक चित्रनिर्मिती या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे शिखरे रंगरेषांची आणि नीलधवल ध्वजाखाली हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे.

परांजपे यांना ‘कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार तसेच ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. फेब्रुवारी २०२२मध्ये त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.

Share This News
error: Content is protected !!