पुणे- पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे स्टेशनजवळील शौचालयात हा प्रकार झाला आहे. दरम्यान, नराधम आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, पुणे रेल्वे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयामधील महिलांच्या स्वच्छतागृहात पीडित मुलगी गेली असता आरोपीने तिचा पाठलाग केला. आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी अंदाजे ३५ वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर बातमी थोड्याच वेळात..