राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ सदस्यांचा कार्यकाळ संपला

416 0

नवी दिल्ली- राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं सविस्तर वेळापत्रक जारी केलं आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेचे शिवसेना खासदार संजय राऊत, भाजपचे राज्यसभा खासदार पियूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी.चिदंबरम यांच्या ६जागांसह राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५७ जागांसाठीचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ११, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी ६, बिहारमधून ५ आणि राजस्थान आणि कर्नाटकमधून ४-४ जागांवर निवडणूक होणार आहे. २४ मे रोजी ५७ जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

महाराष्ट्रातून ६ जागा रिक्त

पियुष गोयल (भाजप)
पी चिदंबरम (काँग्रेस)
प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस)
विकास महात्मे (भाजप)
संजय राऊत ( शिवसेना)
विनय सहस्त्रबुद्धे (भाजप)

राज्यसभेत एकूण संख्याबळ २३८ आणि राष्ट्रपती नियुक्त १२ अशा २५० जागा असतात. सध्या राज्यसभेच्या २४५ जागा आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर १९ जागा निवडून दिल्या जातात. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. तर, सध्याच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे २ राष्ट्रवादी काँग्रेसचा १, शिवसेनेचा १ आणि काँग्रेसचा १ खासदार निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावेदारी सांगितली आहे. त्यामुळं निवडणुकीत कुणाला डावलले जाणार हे पाहावं लागणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!